By  
on  

'इंडियन आयडल मराठी'च्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये विजेतेपदासाठी रंगणार सुरांची टक्कर!

सोनी मराठी वाहिनीवरील फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. 'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. 'अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा' अशी टॅगलाईन असलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धक आले होते. त्यातून नुकतेच महाराष्ट्राला टॉप ५ स्पर्धक मिळाले आहेत. विजेतेपदासाठी आता सुरांची टक्कर बघायला मिळते आहे. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरू झाली आहे. जगदीश चव्हाण, प्रतीक सोळसे, सागर म्हात्रे, श्वेता दांडेकर आणि भाग्यश्री टिकले हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोचले आहेत. पहिल्यांदाच मराठी भाषेत! 'इंडियन आयडल' सुरू झालं आणि देशाचा अभिमान असलेले अजय-अतुल यांनी महाराष्ट्रासाठी आवाज शोधण्याचं कार्य हाती घेतलं. एवढे दिग्ग्ज परीक्षक आणि अर्थातच प्रेक्षक पहिल्या पर्वाचा विजेता निवडणार असल्याने उत्सुकता शिगेला पोचली आहे. 

नाशिक जिल्यातला निफाडचा जगदीश आणि दिंडोरीचा प्रतीक, पनवेलचा सागर, वसईची श्वेता आणि नागपूरची भाग्यश्री टिकले या स्पर्धकांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर, परीक्षकांच्या गुणांनी आणि प्रेक्षकांच्या मताच्या आधारे टॉप ५ मध्ये बाजी मारली आहे. या स्पर्धकांमध्ये स्पर्धा चांगलीच रंगत जाते आहे. प्रत्येकाची आवाजाची शैली, सादरीकरणाची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आहे. टॉप १४ मधून बाजी मारलेल्या या शिलेदारांनी रसिकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. संपूर्ण पर्वात अनेक पाहुणे आले आणि त्यांनी स्पर्धकांना मोलाचं मार्गदर्शन केलं. अजय-अतुल यांच्यासारखे लोकप्रिय आणि अनुभवी परीक्षक असल्याने ही ५ रत्नं महाअंतिम फेरीत एकमेकांशी लढणार आहेत. 

 

आता स्पर्धा शेवटच्या टप्प्यात येऊन पोचली आहे. लवकरच 'इंडियन आयडल मराठी' पर्वाचा विजेता किंवा विजेती महाराष्ट्राला मिळणार आहे. विजेतेपदासाठी सुरू असलेली चुरस, घेतली जाणारी मेहनत, हे सगळं बघण्यासाठी अनुभवण्यासाठी पाहत राहा,
 पाहा, 'इंडियन आयडल मराठी', सोम.-बुध., रात्री ९ वाजता, फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive