By  
on  

PeeepingMoon : अस्तित्वाच्या लढाईसाठी मुक्ता बर्वे हातात मशाल घेऊन तयार!

गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र 'वाय' या सिनेमाची चर्चा सुरू आहे. या सिनेमात अभिनेत्री मुक्ता बर्वे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नुकत्याच एका पोस्टर मधून मुक्ताचा एक लूक समोर आला आहे. ज्यात मुक्ता बर्वे हातात मशाल घेऊन लढताना दिसत आहे आणि तिच्या डोळ्यात आक्रमकपणा दिसत आहे. "अंधाराच्या भीतीने मशाल का कधी विझत असते… अस्तित्वाच्या या लढ्यात ‘ती’ येतेय… स्वतः मशाल होऊन…!" असे तिने हे पोस्टर शेअर करताना म्हटले आहे. तिचा हा लढा नेमका कोणासाठी आहे आणि का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहेत.

या पोस्टरमुळे अनेकांना तिच्या जोगवा सिनेमातील भूमिकेची आठवण झाली. मुक्ताने जोगवा सिनेमात केलेल्या दमदार अभिनयामुळे तिचे खूप कौतुक झाले होते. तसेच तिला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात देखील आले होते. जोगवा नंतर गेल्या १३ वर्षात मुक्ताने अनेक रोमँटिक भूमिका केल्या. मुंबई पुणे मुंबई, मंगलाष्टक वन्समोअर, लग्न पहावे करून, डबलसीट, स्माईल प्लिज ई. सिनेमांतून आणि तिच्या एका लग्नाची दुसरी गोष्ट आणि अजूनही बरसात आहे या मालिकांमुळे तिचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला.

पण 'वाय' या सिनेमाच्या निमित्ताने मुक्ता पुन्हा एकदा एका सशक्त भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जोगवा सिनेमानंतर मुक्ताची 'वाय' या सिनेमात कुठली भूमिका असणार आहे. ती हातात मशाल घेऊन कुणाविरुद्ध लढणार आहे हे पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive