सुबोध भावे पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला...

By  
on  

मराठी कलाविश्वातील एक उत्तम कलाकार म्हणून अभिनेता सुबोध भावे कडे पाहिलं जातं. 'बालगंधर्व', 'डॉ. काशिनाथ घाणेकर', 'लोकमान्य एक युगपुरुष', 'कट्यार काळजात घुसली' अश्या अनेक उत्कृष्ट सिनेमांत वेगवेगळ्या भूमिका करत सुबोध भावेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

सुबोध भावे त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. 'कट्यार काळजात घुसली' या सिनेमाचं दिग्दर्शन केल्यानंतर तो आता पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे.

सुबोधने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो पोस्ट करत ही बातमी शेयर केली. "खूप महीने संहितेवर काम केल्यानंतर आता आम्ही शूट साठी तयार आणि दिग्दर्शक म्हणून मी एक वेगळा प्रयत्न केलाय." असं म्हणत त्याने हा फोटो शेयर केला. या सिनेमाचं लेखन गीतकार, कवी आणि लेखक वैभव जोशी यांनी केलं आहे तर नितीन वैद्य या सिनेमाचे निर्माते आहेत. 

या सिनेमाचं नाव काय असेल? कथा काय असेल? आणि या सिनेमात कलाकार कोणकोण असतील? याबद्दल सुबोधने "बाकी सहप्रवासी पुढच्या काळात समोर येतीलच.." असं म्हटलं आहे. त्यामुळे सुबोध भावे पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीत दिसणार असल्यामुळे सुबोधचे चाहते त्याच्या या नवीन सिनेमासाठी खुपचं उत्सुक आहेत.

Recommended

Loading...
Share