By  
on  

'रंग माझा वेगळा' मधील साईशाला नवीन ऑफर ; यासाठी सोडली मालिका!

स्टार प्रवाह वरील 'रंग माझा वेगळा' ही लोकप्रिय मालिकांपैकी एक असून टीआरपी रेटिंग मध्येही नेहमी अव्वल राहणारी ही मालिका आहे. बाकी कलाकारांप्रमाणे मालिकेतील दीपा आणि कार्तिकी या बालकलाकारांनी देखील प्रेक्षकांच्या मानत स्थान निर्माण केले आहे.

मालिकेत कार्तिकीची भूमिका साईशा भोईर हिने तर दीपिकाची भूमिका स्पृहा दळीने साकारली आहे. दरम्यान, मालिकेतील कार्तिकी म्हणजेच साईशा भोईरने ही मालिका सोडल्याचे वृत्त समोर आले आहे. साईशाला एका मोठ्या प्रोजेक्टची ऑफर आली असल्यामुळे तिने ही मालिका सोडली असल्याचे म्हटले जात

साईशाच्या आई-वडिलांनी तिच्यासोबत इंस्टाग्रामवर लाइव्ह करून चाहत्यांना याबाबत माहिती दिली. या व्हिडिओत साईशाच्या आईवडिलांनी सांगितले की, "रंग माझा वेगळा' मालिकेत आता साईशा दिसणार नाही. तिच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ती मालिकेत दिसणार नसली तरी ती तुमच्यासोबत सोशल मीडियावर संपर्कात राहणार आहे. त्याचबरोबर घरातून शुटिंगच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे तिला शाळा आणि अभ्यासासाठी फार वेळ मिळत नव्हता. तसेच तिच्या तब्येतीसाठी देखील आम्ही निर्णय घेतला." असं ते म्हणाले

या व्हिडीओत साईशा म्हणाली, "मला खूप कंटाळा आला होता. मला शाळेत जायचे आहे." तसेच साईशाचे आई बाबा म्हणाले की, "जसे तुम्ही साईशाला कार्तिकीच्या भूमिकेत प्रेम दिले तसेच नव्या कार्तिकीलाही प्रेम द्या. साईशाच्या आई वडिलांनी पुढे सांगितले की, "ती लवकरच तुम्हाला रुपेरी पडद्यावर काम करताना दिसणार आहे. तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती आम्ही तुम्हाला सोशल मीडियावर देत राहू."
 

Recommended

PeepingMoon Exclusive