By  
on  

जळगावच्या ललिता जाधव मांडणार शेतकर्‍यांच्या कुटुंबाची व्यथा!

   भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. शेतकरी संपूर्ण देशाला अन्न देतो पण त्याच्या घरचं ताट पंचपक्क्वनाने कधी भरत नाही.  कर्जाच्या जाळ्यात अडकलेला शेतकरी शेवटी आत्महत्या करतो आणि स्वतःच्या आयुष्याचा शेवट करतो परंतु त्या शेतकऱ्याच्या मागे त्याच्या कुटुंबाचे हाल होत असतात. अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं कुटुंब आपला उदरनिर्वाह करत असतो. स्वतःच्या पतीने आत्महत्या केली असल्याने 'कोण होणार करोडपती' या मंचावरून जळगावच्या ललिता जाधव सगळ्यांना सांगू इच्छितात की, 'आत्महत्या हा मार्ग नाही तर ती अजून एक मोठी अडचण आहे'. मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी ललिता 'कोण होणार करोडपती' या खेळात सहभागी झाल्या आहेत.

                       जळगावच्या ललिता जाधव 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत कारण त्यांना  मुलांच्या शिक्षणासाठी पैसे साठवायचे आहेत. ललिता या अंगणवाडी शिक्षिका आहेत. या आधी त्या सेविका म्हणून काम करत. पण त्यांना स्वतःची प्रगती करायची होती. म्हणून  त्यांनी लग्नानंतर अजून शिक्षण घ्यायचे ठरवले. परंतु घरची परिस्थिती बेताची असल्याने कधी ओवाळणीतून किंवा अजून कुठून  जर पैसे भेट म्हणून मिळाले तर ते पैसे त्या जपून ठेवत आणि  लागतील तसे ते पैसे शिक्षणासाठी वापरत. असे करून त्यांनी एम.ए.  केले आणि त्या शिक्षिका  झाल्या. ललिता यांचे लग्न एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात झाले. त्यामुळे सासरी देखील पैशाची अडचण कायम असायची. कधी हवामान साथ देत नाही तर कधी पिकाला हवा तो भाव मिळत नाही. म्हणून कायम हातात जेमतेम पैसा असे. या सगळ्या मुळे कर्ज घेण्याची  वेळ आली पण आता ते कर्ज फेडणार कसे. फेडण्याचा काही मार्ग दिसला नाही म्हणून ललिता यांच्या पतीने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली आणि ललिता आणि मुलांना सोडून निघून गेले. त्यानंतरचा खडतर प्रवास ललिता यांनी एकटीने केला.

'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात येऊन त्या त्यांच्या मुलांचं भविष्य सुधारू इच्छितात त्याचबरोबर शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचा त्यांचा उद्देश आहे. पाहायला विसरु नका 'कोण होणार करोडपती' आज रात्री 9 वाजता. आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive