'चला हवा येऊ द्या' टीमसाठी श्रेया बुगडेची पोस्ट, म्हणते 8 वर्षानंतर

By  
on  

‘कसे आहात मंडळी, हसनाय ना, हसायलाच पाहिजे’ असं म्हणत गेल्या नऊ वर्षांपासून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणा-या चला हवा येऊ द्याच्या नव्या पर्वाला लवकरच सुरुवात होत आहे. या कार्यक्रमाद्वारे भाऊ कदम, निलेश साबळे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, सागर कारंडे हे कलाकार प्रसिद्धीझोतात आले आहेत. अनेक बॉलिवूड , मराठी सिनेमे, नाटक आणि मालिका यांचं प्रोमोशन करण्यासाठी चला हवा येऊ द्या हे हक्काचं व्यासपीठ.

या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून श्रेया बुगडेला ओळखले जाते. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने सर्व प्रेक्षकांना एक गुडन्यूज दिली आहे.

 

 

“तब्बल ८ वर्षांनी, नव्या वास्तूत आजपासून थुक्रटवाडी चा श्री गणेशा!!! तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असू द्या नेहेमीप्रमाणे”, असे श्रेया बुगडेने या व्हिडीओला कॅप्शन देताना म्हटले आहे. तिची ही पोस्ट आणि तो व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या या पोस्टवर अनेक चाहते लाईक्स आणि कमेंट करताना दिसत आहेत.

Recommended

Loading...
Share