By  
on  

बिगबॉस मराठीच्या चौथ्या सिजनमध्ये होणार का हा मोठा बदल, कोण असणार सुत्रसंचालक?

छोट्या पडद्यावरील नेहमीच चर्चेत राहणारा रियालिटी शो म्हणजे बिगबॉस. बिग बॉस मराठी या कार्यक्रमाचं चौथं पर्व लवकरच सुरू होत आहे. या चौथ्या पर्वामध्ये काही नवी चेहरे स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. या टीझरमुळं प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान महेश मांजरेकरांनी बिगबॉस मराठीच्या तिन्ही पर्वाचे सूत्रसंचालन केले होते. यामुळे बिगबॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा नवीन होस्ट कोण असणार याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

महेश मांजरेकर सूत्रसंचालन करणार नसतील तर त्यांच्याऐवजी अभिनेता सिद्धार्थ जाधव बिगबॉस मराठीच्या मंचावर सूत्रसंचालन करताना दिसू शकतो, असं म्हटलं जात होतं. पण त्याच्या नावावरही अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही. त्याचप्रकारे नाना पाटेकर यांना होस्टिंगसाठी विचारण्यात आले होते, मात्र त्यांनी यासाठी नकार दिल्यानंतर मराठीतील दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि अभिनेता अंकुश चौधरी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. अद्याप बिगबॉस मराठीच्या चौथ्या सिजनसाठी सूत्रसंचालकाचे नाव जाहीर झाले नसेल तरी बिगबॉसची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive