'भाग्य दिले तू मला' मधील काकू-बोक्या यांची सोशल मीडियावर देखील हवा ; त्यांच्या या रीलला १६ कोटी व्ह्यूज

By  
on  

भाग्य दिले तू मला या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य निर्माण केले आहे. राजवर्धन आणि कावेरी यांची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. राज आणि कावेरी अर्थात अभिनेता विवेक सांगळे आणि अभिनेत्री तन्वी मुंडले मालिकेप्रमाणे सोशल मीडियावर देखील हिट आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेले त्यांचे रील्स आणि व्हिडीओ चाहत्यांना आवडत असतात. नुकतंच त्यांच्या एका रील व्हिडिओला १६ कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.

तन्वी-विवेक यांनी नुकताच त्यांचा आईस्क्रीम खातानाचा एक रील व्हिडिओ शेयर केला होता, ज्यात तन्वी आणि विवेक आईस्क्रीम खात असतात. मात्र हे दोघे आईस्क्रीम खात असताना या व्हिडिओत तन्वी विवेकची मस्त फजिती करते. त्यांचा हा गंमतीशीर व्हिडिओ चाहत्यांना चांगलाच आवडला असुन हा व्हिडीओ खूप वायरल झाला आहे. त्यामुळे या व्हिडिओला १६ कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.

भाग्य दिले तू मला मालिकेत तन्वी आणि विवेक यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांना तर प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंच आहे; पण त्याशिवाय कलाकार म्हणूनही प्रेक्षकांना ते आवडत आहेत हे त्यांच्या रील्स आणि व्हिडीओवरून समजतंय. दरम्यान मालिकेत तन्वी आणि विवेक म्हणजेच कावेरी आणि राजवर्धन यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत असून सोशल मीडियावरील रील व्हिडीओज मध्ये दिसणारा त्यांचा वेगळा अंदाज देखील चाहत्यांना चांगलाच भावत आहे. 

Recommended

Loading...
Share