रमात गुंतलेला आनंदीचा राघव

By  
on  

अभिनेता कश्यप परुळेकर ह्यांनी  खूप विविध  भूमिका साकारल्या आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपट द्वारे  ह्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे.अभिनेता कश्यप परुळेकर आता नवा गडी नवं राज्य या मालिकेत राघवच्या  व्यक्तिरेखेत भेटीस येणार आहे. ही मालिका ८ ऑगस्टपासून रात्री ९ वाजता सादर होणार आहे.

प्रोमोमध्ये सगळ्यांनी राघवला पाहिले, आनंदी त्याच्या आयुष्यात आलेली असतानाही अजूनही तो रमाच्या आठवणीत आहे. राघव आनंदीला स्वीकारू शकेल का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. ह्या मालिकेबद्दल आणि त्याच्या व्यक्तीरेखेबद्दल सांगताना राघव म्हणाला, "झी मराठी बरोबर मी पहिल्यांदाच प्रमुख भूमिकेत काम करत आहे. मी खूप उत्सुक आहे कारण ह्या पूर्वी काही ना काही कारणा मुळे योग येत नव्हता. राघव ह्या भूमिकेला वेगवेगळे पदर आहे, तो खूप प्रेमळ आणि कुटुंबवत्सल व्यक्ती आहे. आनंदी त्याच्या अधुऱ्या संसारात आली असतानाही तो रमाच्या आठवणीं मध्ये गुंतला आहे. जशी जशी मालिका पुढे जाईल तस तशी राघव हि व्यक्तिरेखा प्रेक्षकांना हळू हळू उलगडायला लागेल. "

Recommended

Loading...
Share