'योगयोगेश्वर जय शंकर' मालिकेत सृष्टी पगारेची एंट्री ; साकारणार 'ही' महत्वपूर्ण भूमिका

By  
on  

श्रावण महिना म्हटलं कि, अनेक सण समारंभ, व्रतवैकल्ये, पूजाविधी यांची रेलचेल असते त्यात सगळयांचा लाडका सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवसाची वाट आपण सगळेच बघत असतो . याच बरोबर येते संततीरक्षणार्थ  केली जाणारी जिवतीची पूजा,या पूजेचे महत्व देखील काही  खास आहे. लवकरच कलर्स मराठीवरील योगयोगेश्वर जय शंकर मालिकेमध्ये जिवतीची पूजा आणि रक्षाबंधन विशेष भाग बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये याचे महात्म्य देखील गोष्टी रूपात सांगितले जाणार आहे. याचसाठी मालिकेत एक विशेष एंट्री होणार आहे. कलर्स मराठीवरील स्वामिनी मालिकेत रमा बनून मराठी मनावर जिने अधिराज्य गाजवले,   सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमातून जिने संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले अशी आपल्या सगळयांची लाडकी "सृष्टी पगारे" मालिकेत पावनीची महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.  

मालिकेमध्ये बाळ शंकर राहत असलेल्या गावामध्ये एक महसूल अधिकारी आणि त्यांचे कुटुंब राहायला येणार असून त्यांचीच मुलगी पावनी. जिचा विश्वास आहे तिचा भाऊ परत येणार आहे असे तिला भास देखील होत आहेत. आता पावनीचे हे भास खरे आहेत का ? तिची तिच्या भाऊरायाशी भेट होईल का ? बाळ शंकर यात तिची मदत कशी करतील ? हे सगळे मालिकेच्या रक्षाबंधन विशेष भागांमध्ये बघायला मिळणार आहे.

याबद्दल बोलताना सृष्टी म्हणाली, "मी या भूमिकेसाठी खूपचं उत्सुक आहे. कारण या मालिकेद्वारे मी पुन्हाएकदा कलर्स मराठी परिवाराशी जोडली जाणार आहे. पुन्हा त्याच सोनेरी आठवणी समोर येत आहेत. तसंच आरुषसोबत काम करायला मिळतं आहे माझं भाग्य आहे. कामाबरोबर बरीच धम्माल मस्ती देखील सुरु असते आमची सेटवर. जसं रमा या भूमिकेवर संपूर्ण महाराष्ट्राने प्रेम केलं तसंच पावनीवर देखील करा आणि आमची मालिका नक्की बघा". 

Recommended

Loading...
Share