वाघमारे कुटुंबाचं नवीन घराचं स्वप्न पूर्ण होणार का?

By  
on  

झी मराठी वाहिनीवरील 'तू चाल पुढं' हि नवीन मालिका लोकांचं मन जिंकत आहे. आता पर्येंतच्या भागात तुम्ही पहिले कि एकिकडे नवरा आणि दुसरीकडे मुलीचा वाढदिवस ह्या कात्रीत सापडलेली अश्विनी अखेर तिच्या सेव्हिंगच्या डब्यातले पैसे मयुरीला देते. श्रेयस आपलं राहतं घर परस्पर विकण्याचा प्लॅन करतो आणि त्याचा फायदा उचलून अश्विनीच्या वाढदिवसानिमित्त आज हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचं श्रेयस कुटुंबाला सांगतो.

सगळे खुश होतात मात्र अश्विनी-मयुरीचा चेहरा उतरतो कारण मयुरी आज ठरल्याप्रमाणे मित्रांना पार्टी देणार असते. अश्विनी तिला सुचवते की तुझ्या मित्र-मैत्रिणींना आपल्या घरी पार्टी देऊन मग तू हॉटेलला ये. मयुरी तिच्या मित्रांसोबत आणि श्रेयस त्याच्या क्लायंटसोबत एकाचवेळी घराकडे निघाले आहेत. श्रेयस ही डील मिळवू शकेल का? आणि वाघमारे कुटुंबाचं नवीन घराचं स्वप्न पूर्ण होणार का ? हे प्रेक्षकांना लवकरच मालिकेत पुढच्या भागात पाहायला मिळेल. 

Recommended

Loading...
Share