'गॉसीप आणि बरंच काही' मालिकेत पाहायला मिळणार कलाकारांची पडद्यामागची धमाल मस्ती!

By  
on  

सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन सातत्याने करत असते. मनोरंजनाची अचूक वेळ हे सोनी मराठी वाहिनीचं वैशिष्ट्य आहे. मायबाप प्रेक्षक पडद्यावरील मालिकांवर तसंच कलाकारांवर प्रेम करतात. मालिकांच्या पडद्यामागचं वातावरणं कसं असेल, हे जाणून घेण्याची उत्सुकताही प्रेक्षकांना लागून राहिलेली असते. येत्या २१ ऑगस्टपासून दर रविवारी 'गॉसीप आणि बरंच काही' या मालिकेमधून मालिकेतल्या कलाकारांची पडद्यामागची धमाल, मजा, मस्ती आणि गप्पा हे सारं प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे. 

सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांचा विचार करून नवनवे कार्यक्रम प्रेक्षकांसाठी आणत असते. कलाकारांच्या वा मालिकांच्या पडद्यामागच्या गमतीजमती हल्ली सोशल मिडियावर पाहायला मिळतात मात्र जो प्रेक्षकवर्ग या सोशल मिडियापासून, मोबाईलपासून दूर आहे त्या प्रेक्षकवर्गाला आता कलाकारांची, मालिकांची पडद्यापलीकडली धमाल दूरदर्शनच्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमामध्ये मालिकांच्या सेटवर जाऊन त्या मालिकेतल्या कलाकारांपैकी एक सूत्रसंचालक घेऊन संपूर्ण पडद्यामागची मजामस्ती त्या सूत्रसंचालकाबरोबरच पडद्यावर पाहायला मिळणार आहे. येत्या रविवारी सोनी मराठी वाहिनीवरच्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातलं पडद्यामागचं ‘गॉसीप आणि बरंच काही’ पाहणं रंजक ठरणार आहे. 

Recommended

Loading...
Share