बिगबॉस मराठी फेम 'या' अभिनेत्रीची आई कुठे काय करते मालिकेत एन्ट्री

By  
on  

स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते ही मालिका अनेक लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांना अगदी आपलंसं वाटतं आणि आता आणखी एका नवीन पात्राची एन्ट्री होणार आहे. बिगबॉस फेम अभिनेत्री मीरा जगन्नाथ ची या मालिकेत एण्ट्री होणार असून आता ती कोणत्या भूमिकेत दिसणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

आई कुठे काय करते मालिकेत सध्या अरुंधती ही वेगळ्या घरात राहत असली तरी तिची देशमुख कुटुंबासोबत रेलचेल चालूच आहे, त्यात आशु आणि अरुंधती यांची मैत्री अनिरुद्धसह कांचन आईना देखील खटकत आहे. याव्यतिरिक्तअभिजित हा आईवर काहीनाकाही कारणांनी नाराज असतोच. त्यात आता अभिनेत्री मीरा जगन्नाथ ही नव्या पात्रासह या मालिकेत येणार आहे. तिच्या येण्याने मालिकेत आता काय वळण येणार आहे? यासाठी सगळेच प्रेक्षक आतूर आहेत.

दरम्यान  मीरा जगन्नाथ याआधी येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत दिसली होती. त्यानंतर बिगबॉस मराठी मध्ये तिची वर्णी लागली. बिगबॉस मध्ये सुद्धा ती कायम चर्चेत राहिली होती, आता या नवीन मालिकेत मीरा प्रेक्षकांसाठी काय घेऊन येतेय, यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

Recommended

Loading...
Share