ब्लॉकबस्टर चंद्रमुखी सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

By  
on  

सुपरहिट सिनेमांची मेजवानी देत प्रेक्षकांचा रविवार खास बनवणाऱ्या प्रवाह पिक्चरवर २५ सप्टेंबरला ब्लॉकबस्टर चंद्रमुखी सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर भेटीला येणार आहे. लेखक विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी कादंबरीवर हा सिनेमा बेतलेला असून राजकारणी दौलत देशमाने आणि लावणी कलावंत चंद्रा यांची प्रेमकहाणी सिनेमात पाहायला मिळेल. या सिनेमातलं चंद्रा हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अजय-अतुलचं संगीत आणि चंद्रा म्हणजेच अमृता खानविलकरच्या दिलखेचक अदांनी या गाण्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. चंद्राच्या या अदा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरच्या निमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहेत. 

पदार्पणातच प्रवाह पिक्चर वाहिनीला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. पावनखिंड, झिम्मा, कारखानिसांची वारी, स्टेपनी, बळी या सिनेमांच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर नंतर आता उत्सुकता आहे चंद्रमुखी सिनेमाची. तेव्हा चंद्राची जादू पुन्हा एकदा अनुभवायला सिद्ध व्हा. २५ सप्टेंबरला दुपारी १ वाजता प्रवाह पिक्चरवर.

Recommended

Loading...
Share