By  
on  

या तीन देवींचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही धराल ताल, ओळखा पाहू कोण आहेत?

'रात्रीस खेळ चाले 2' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील अनेक पात्र आज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. 

नुकतंच या मालिकेतील शेवंता हे पात्र साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने एक डान्स व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेयर केला असून चालत्या गाडीत या मालिकेतील कलाकार डान्स करत आहेत. 

 

या व्हिडिओमध्ये या मालिकेतील शोभा हे पात्र साकारणारी  मंगल राणे,  सरिताच्या भूमिकेत झळकणारी प्राजक्ता वाडये आणि अण्णा गुरवच्या भूमिकेत स्वतःची छाप पडणारे अनिल गावडे हे कलाकार धमाल करताना दिसत आहेत. 'तारे गिन गिन याद के तेरी' या हिंदी गाण्यावर हे कलाकार नाचत आहेत. या व्हिडिओमध्ये हे कलाकार चालत्या गाडीत असून ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शूटसाठी जात असावेत. 

'रात्रीस खेळ चाले 2' ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर असून या मालिकेत कोणत्या नाट्यमय घटना घडणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive