'झी मराठी'ची लाडकी सुनबाई आता घेऊन येतेय सासूबाईंना

By  
on  

प्रेक्षकांची लाडकी मालिका 'तुला पाहते रे' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. 'तुला पाहते रे'च्या जागी कोणती नवीन मालिका येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. नेहमीच नवनवीन संकल्पना मांडणारी 'झी मराठी' या मालिकेतून सुद्धा काहीसा वेगळा आणि हटके विषय घेऊन येत आहे. 

अखेर नुकतंच 'झी मराठी'ने नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. 'अग्गबाई सासूबाई' असं या नवीन मालिकेचं नाव आहे. या प्रोमोमध्ये भटजीबुवा 'मुलीच्या मामाने मुलीला घेऊन या' असं सांगतात. त्यावर ''मुलीचे मामा तर केव्हाच वर गेले, मी आणलं तर चालेल'' असं प्रत्युत्तर देऊन सुनबाई नवरीच्या वेशात असलेल्या सासूबाईंना मांडवात घेऊन येते . 

 

 

'अग्गबाई सासूबाई' या नव्या मालिकेत तेजश्री प्रधान आणि निवेदिता सराफ प्रमुख भूमिकेत झळकत आहेत. ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन सुद्धा या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. 

झी मराठीवरील 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेत तेजश्री प्रधानने साकारलेल्या जान्हवीच्या भूमिकेने प्रेक्षकांची पसंती मिळवली. त्यामुळे या नवीन मालिकेत तेजश्रीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच अभिनेत्री निवेदिता सराफ या मालिकेच्या माध्यमातून वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

'अग्गबाई सासूबाई' ही नवीन मालिका २२ जुलैपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

Recommended

Loading...
Share