By  
on  

कोण होणार करोडपतीच्या कर्मवीर स्पेशलमध्ये पाहा ‘वेड्या मास्तरा’ची हुशारी

‘मी उद्यापासून गावच्या रस्त्याच्या कामाला सुरूवात करतो आहे. जो श्रमदान करू इच्छित असेल त्याने श्रमदान करावे. ज्याला मजुरी हवी असेल त्याला मजुरी मिळेल. फुकट कुणालाही राबवून घेणार नाही.’

हे उद्गार आहेत गुंडेगाव शाळेतल्या भापकर गुरूजींचे. आपल्या तुटपुंज्या पगारावर घर बांधणंही शक्य होत नाही तिथे १९६० साली या गुरूजींनी रस्ताबांधणीच्या कामाला सुरूवात केली आणि गुंडेगाव ते कोळगाव रस्ता बांधला. ज्ञानाच्या गाठोड्यासोबत जिद्द उराशी बाळगली तर अशक्य ही शक्य होऊ शकतं, याचं जिवतं उदाहरण म्हणजे भापकर गुरूजी. वेडा मास्तर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मास्तराने गाढवांच्या मदतीने बांधलेल्या रस्तातून आपल्या हुशारीची पोचपावती दिली. अशा कमाल व्यक्तिमत्त्वाची भेट घडणार आहे, कोण होणार करोडपती च्या कर्मवीर स्पेशलमध्ये. या विशेष भागात भापकर गुरूजींसोबत आपल्या अनोख्या शैलीने महाराष्ट्रावर जादू करणारे मकरंद अनासपुरे ही दिसणार आहेत.

भापकर गुरूजी, मकरंद अनासपुरे यांचा सहभाग आणि नागराज मंजुळेंचं सूत्रसंचालन या सगळ्याच गोष्टींनी कोण होणार करोडपती? चा कर्मवीर विशेष भाग खऱ्या अर्थी विशेष झाला आहे. या वेड्या मास्तराने आपल्या कामगिरीच्या जोरावर ‘डोंगर फोडणारे गुरूजी’, ‘रस्तेवाले गुरूजी अशी अनेक नावं कमावली’. या मास्तरांबरोबर मकरंद अनासपुरेंना पहायला विसरू नका, या गुरूवारी रात्री ८.३० वाजता कोण होणार करोडपती? कर्मवीर स्पेशलमध्ये फक्त आपल्या सोनी मराठीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive