'तुला पाहते रे' संपल्याविषयी सुबोध भावेने लिहिली भावनिक पोस्ट

By  
on  

झी मराठीवरील 'तुला पाहते रे' ही मालिका अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.  बघता बघता ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. या मालिकेतील सर्व व्यक्तिरेखांवर प्रेक्षकांनी  भरभरून प्रेम केले. सर्वांच्या या लाडक्या मालिकेने अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतला. 

'तुला पाहाते रे' चा शेवटचा भाग काल संपन्न झाला आणि ही मालिका संपली. कोणत्याही कलाकारासाठी एखादी कलाकृती संपणं हा इमोशनल क्षण असतो. यानिमित्ताने या मालिकेतील विक्रांत सरंजामे हे मुख्य पात्र रंगवणाऱ्या सुबोध भावेने फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहिली. 'प्रेक्षकांकडून मिळालेलं प्रेम आयुष्यभर ऊर्जा देत राहील', अशा शब्दात सुबोधने सर्व प्रेक्षकांचे आभार मानले. 

 

 

'तुला पाहते रे' मालिकेने टीआरपी चे सर्व विक्रम मोडले. आता या लाडक्या मालिकेने प्रेक्षकांना गुडबाय केलं असलं तरी त्या जागी एक नवी मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास येत आहे. अभिनेत्री निवेदिता सराफ, तेजश्री प्रधान आणि अभिनेते गिरीश ओक यांची प्रमुख भूमिका असलेली 'अग्गबाई सासूबाई' ही मालिका उद्यापासून रात्री ८.३० वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

Recommended

Loading...
Share