By  
on  

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत घडणार आणखी एक दुर्दैवी घटना, जाणून घ्या

समृद्ध इतिहासाची समर्पक मांडणी केल्याने 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. नुकतंच या मालिकेत संभाजी महाराजांनी शिक्षा ठोठवल्यानंतर अनाजीपंत आणि इतर दोषी कारभाऱ्यांना हत्तीच्या पायी देण्यात आल्याचा प्रसंग दाखवण्यात आला.

कारभाऱ्यांना पाठीशी घातल्याप्रकरणी संभाजी महाराज सोयरा मातोश्रींना दोष देऊन नजरकैदेत ठेवतात. सोयराबाईंना आपली चूक लक्षात येऊन त्या प्रायश्चित्त घेण्यासाठी महालाचे दरवाजे बंद करतात. सोयराबाईंना समजावण्यासाठी येसूराणीसाहेब महालाबाहेर थांबतात. त्यानंतर हंबीरमामा आल्यावर सोयराबाई महालाचा दरवाजा उघडतात. 

हंबीरराव सुद्धा झालेल्या प्रकाराबद्दल सोयराबाईंवर आगपाखड करतात. पुढे सोयरा मातोश्री 'आता मुक्काम हलवायची वेळ आलीय' असं हंबिररावांना म्हणतात. पुढे पश्चातापाच्या आगीत धुमसत असलेल्या सोयराबाई प्राण त्याग करतात. 

या घटनेने सगळा रायगड हादरतो. आपण सोयरामातोश्रींना खूप जास्त बोललो म्हणून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं याची खंत शंभूराजेंना वाटते. सोयराबाईंच्या या आकस्मिक निधनानंतर या मालिकेत इतिहासाची कोणती रोमहर्षक पानं उलगडणार, हे पाहणं औत्सुक्याचं आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive