By  
on  

पाहा व्हिडिओ: 'अग्गबाई सासूबाई' मालिकेचं हे रेट्रो थीमचं शीर्षकं गीत तुम्हाला नक्की आवडेल

'झी मराठी'वरील 'तुला पाहते रे' ही मालिका संपली आणि या मालिकेच्या जागी आता कोणती नवीन मालिका येणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. अखेर 'अग्गबाई सासूबाई' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. २२ जुलैपासून ही मालिका सुरु झाली असून या मालिकेचं शीर्षक गीत प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. 

'झी मराठी'वरील मालिकांचं शीर्षक गीत हा नेहमी जिव्हाळ्याचा विषय असतो. शीर्षक गीतं प्रेक्षकांच्या स्मरणात राहावीत यासाठी 'झी मराठी' सतत प्रयत्नशील असते. 'अग्गबाई सासूबाई' या मालिकेचं शीर्षक गीतसुद्धा असंच हटके असल्याचं नुकतंच पाहायला मिळालं. सासूचं लग्न करन्यास सुनबाई कशी पुढाकार घेते, अशी एक सासू-सुनेची वेगळी कथा या मालिकेत प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. 'घेऊन करा राहिली उभी करवली सुनबाई.....!!' अशा शब्दांचा अनोखा संगम असलेलं आणि रेट्रो पद्धतीच्या संगीताने परिपूर्ण असं हे शीर्षक गीत पुन्हा पुन्हा ऐकायची इच्छा निर्माण होईल इतकं सुंदर झालं आहे. गायिका मधुरा दातारच्या सुमधुर आवाजात हे शीर्षक गीत स्वरबद्ध झालं आहे. 

 

 

'अग्गबाई सासूबाई' ही मालिका २२ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत निवेदिता सराफ, गिरीश ओक आणि तेजश्री प्रधान प्रमुख भूमिकेत झळकत आहेत. 

Recommended

PeepingMoon Exclusive