By  
on  

तुझ्यात जीव रंगला : अखेर येणार का राजा राजगोंडाचा खरा चेहरा सर्वांसमोर?

'तुझ्यात जीव रंगला' मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आहे. राजा राजगोंडाची मालिकेत झालेल्या एंट्रीमुळे मालिकेत अनेक नाट्यमय प्रसंग घडत आहेत. परंतु आता मात्र या मालिकेला आणखी एक कलाटणी मिळणार आहे. 

राजा राजगोंडा हाच राणादा आहे हे गुपित राणाचा खास असलेला बरकतला समजणार आहे. तसेच हेच गुपित पप्या अणि नंदिता वहिनीला सुद्धा समजणार आहे. राजा राजगोंडा हाच राणादा आहे, हे समजल्यावर पप्या आणि नंदिता वहिनीला आश्चर्याचा धक्का बसणार आहे. 

 

राजा राजगोंडाचं हे गुपित सर्वांना समजल्यावर आता 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत आणखी कोणती वळणं येणार, हे पाहणं कुतूहलाचा विषय असणार आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive