'सिंधू'मध्ये हरतालिकेचे व्रत, मोदक, आरती आणि बरंच काही.....

By  
on  

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. अर्थातच 'सिंधू..एका सामान्य मुलीची असामान्य गोष्ट' या मालिकेचा सेटही  त्याला अपवाद नाही! विशेष म्हणजे यानिमित्त एकोणिसाव्या शतकात गणेशोत्सव कसा साजरा केला जायचा हे यानिमित्त छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना बघायला मिळेल. इतकेच नाही तर गणेशोत्सवादरम्यान येणार कथेत एक रंजक ट्विस्टही येणार आहे.

 प्रत्येक घराघरामध्ये जशी गणेशाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे तसेच काही सिंधूच्या सेटवर वातावरण आहे. कथानकानुसार सिंधूचे अलीकडेच लग्न झल्यामुळे तिचा हा सासरी पहिला गणेशोत्सव असेल. यानिमित्त ती हरितालिकेच्या व्रताचीही तयारी करताना दिसत आहेत. हरितालिकेचे हे व्रत आपल्या पतीसाठी केले जात असल्यामुळे या व्रताचे अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या कुटूंबात सुख, शांती नांदावी यासाठी महिलांतर्फे भगवान शंकराकडे साकडे घातले जाते. अगदी जुन्या काळापासून सौभाग्यप्राप्तीसाठी आणि आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी अनेकजणी हे व्रत निर्जळी किंवा उपाशी राहून करताना दिसतात. त्यामुळे चिमुकली सिंधू देखील हे हरतालिकेचे व्रत करताना मालिकेत दिसेल.  

येत्या आठवड्यात, देवव्रतसह घरातले सगळे मोठे वाजतगाजत कसे घरी गणपती आणतात हे बघायला मिळेल. मालिकेच्या सुरुवातीपासून सिंधू आणि बाप्पा यांच्यात एक वेगळे नाते असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे अर्थातच ही लहानगी त्याच्या आगमनासाठी उत्साही आहे. त्यामुळे नववधू सिंधूच्या हातून रानडे यांकडच्या बाप्पाला ओवाळण्यात येईल. वाड्यात बाप्पा, आरती, मोदक असे एकूणच मंगलमयी वातावरण असेल. गणपती बाप्पासारखेच देवव्रतलाही मोदक अतिप्रिय आहेत. त्याची भूमिका ही खादाड दाखवळल्याने तो काय गंमत करतो हे बघण्यासारखे ठरेल. नैवेद्याचे मोदक लंपास करण्याचा देवव्रतचा मनसुबा तर सिंधूची ते वाचवण्यासाठीची धडपड अशी बरीच धमालमस्ती येत्या आठवड्यात बघायला मिळेल. या सगळ्यात मात्र अशी एक घटना घडणार आहे ज्यामुळे सगळ्यांना धक्का बसेल. काही चुकीचे तर घडत नाही ना? आता कथानकात हा ट्विस्ट नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी बघत रहा 'सिंधू' रोज रात्री ८ वाजता फक्त मराठीवर!

 

Recommended

Loading...
Share