By  
on  

छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा आक्कासाहेबांचा दबदबा

स्टार प्रवाहवर ३० ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या प्रोमोजनी सध्या सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. सौंदर्य म्हणजे फक्त गोरेपणा नव्हे तर आंतरिक सौंदर्यही तितकंच महत्त्वाचं आहे, हा विचार घेऊन रंग माझा वेगळा ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खास बात म्हणजे ‘पुढचं पाऊल’ या मालिकेद्वारे अक्कासाहेबांच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेल्या हर्षदा खानविलकर ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सौंदर्या इनामदार असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून हर्षदा यांचा निराळा अंदाज या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

रंग माझा वेगळा या मालिकेतील त्यांच्या व्यक्तिरेखेविषयी सांगतना हर्षदा म्हणाल्या, ‘या भूमिकेसाठी मी प्रचंड उत्सुक आहे. पुढचं पाऊल या मालिकेने माझं विश्व बदललं. ३ वर्षांहून अधिक काळ मी ज्या वाहिनीसोबत काम केलं त्या स्टार प्रवाह वाहिनीसोबत पुन्हा एकदा काम करताना माहेरी आल्याची भावना आहे. माझं नव्याने आयुष्य सुरु होतंय असं म्हण्टलं तरी चालेल. सौंदर्या इनामदार नावाप्रमाणेच सौंदर्यावर प्रेम करणारी अत्यंत करारी अशी बिझनेस वुमन आहे. तुम्ही सुंदर असाल तर जगावर राज्य करु शकता हा विचार मानणारी आणि त्याप्रमाणे वागणारी अशी सौंदर्या. पुढचं पाऊलच्या अक्कासाहेबांवर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं आता सौंदर्यावरही तितकंच प्रेम कराल हा आत्मविश्वास आहे.’

याआधी पुढचं पाऊल या मालिकेमधील हर्षदा यांच्या अक्कासाहेब या लूकची बरीच चर्चा होती. तमाम स्त्री वर्गात अक्कासाहेबांच्या साड्या, त्यांचे दागिने आणि खास करुन त्यांचे गजरे प्रसिद्ध होते. ‘रंग माझा वेगळा’ या आगामी मालिकेमधील त्यांचा लूकही हटके असणार आहे. त्यासाठी नक्की पाहा नवी मालिका ‘रंग माझा वेगळा’ ३० ऑक्टोबरपासून रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive