By  
on  

जितेंद्र जोशी घेऊन येतोय गप्पांची मैफिल 'दोन स्पेशल'

मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत सर्वांना आवडणारा लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेता जितेंद्र जोशी. कधी 'तुकाराम'.कधी 'सेक्रेड गेम्स मधला ''काटेकर' तर कधी गावचा 'पोश्टर गर्ल' मधला इरसाल 'सरपंच' अशा अनेक भूमिकांमधून जितेंद्र जोशीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अभिनयासोबत जितेंद्र एक उत्तम लेखक आणि वक्ता आहे. सर्वांचा लाडका जितू अर्थात अभिनेता जितेंद्र जोशी एका नव्या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

कलर्स मराठीवर सुरु होणाऱ्या 'दोन स्पेशल' या नव्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जितेंद्र जोशी सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या प्रोमोत दोन सेलिब्रिटींशी मुलाखत, असं या कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे. जितेंद्र जोशी स्वतःच्या नेहमीच्या शैलीत या शो चं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. योगायोग म्हणजे जितेंद्र जोशीच्या रंगभूमीवर गाजलेल्या नाटकाचं नाव सुद्धा 'दोन स्पेशल' होतं.

 

 

'दोन स्पेशल' हा नवा कार्यक्रम ३१ ऑक्टोबर पासून कलर्स मराठीवर गुरुवार-शुक्रवार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आता या नव्या कार्यक्रमात कोण कोण सेलिब्रिटी हजेरी लावणार, हे पाहणं कुतूहलाचा विषय आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive