By  
on  

या शोमध्ये अभिनेता सुबोध भावेने व्यक्त केल्या लाडक्या नेत्याप्रती भावना

अभिनेता सुबोध भावे अनेकदा सोशल मिडियावर स्पष्टपणे व्यक्त होत असतो. आताही त्याने ‘दोन स्पेशल’ या आगामी शोमध्ये परखडपणे मत व्यक्त केलं आहे. अभिनेता जितेंद्र जोशी होस्ट असलेल्या आगामी ‘दोन स्पेशल’ या कार्यक्रमामध्ये सुमीत राघवन आणि सुबोध भावे हे दोघेही येणार आहेत.

 

यावेळी सुबोध भावे बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेसमोर त्याचं मनोगत मांडताना दिसत आहे. मराठी मुलांच्याविषयीची कळकळ सुबोध यामध्ये बोलून दाखवताना दिसत आहे. याशिवाय तो बाळासाहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र सत्यात उतरवण्याचा निर्धारही व्यक्त करताना दिसत आहे.

 

कलर्स मराठीवर सुरु होणाऱ्या 'दोन स्पेशल' या नव्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जितेंद्र जोशी सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'दोन स्पेशल' हा नवा कार्यक्रम ३१ ऑक्टोबर पासून कलर्स मराठीवर गुरुवार-शुक्रवार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive