गुन्हेगारांना धडा शिकवणाऱ्या साहेबांच्या आयुष्यात येणार का प्रेमाची झुळूक? एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस

By  
on  

सध्या टेलिव्हिजनवर सर्व मालिकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पौराणिक, ऐतिहासिक, रहस्यमयी आहे अनेक मालिकांना प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळत आहे. कलर्स मराठीवर लवकरच 'राजा राणीची गं जोडी' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा प्रोमो नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रोमोपासूनच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण केले आहे. 

एक रुबाबदार पोलीस ऑफिसर त्याच्या बुलेटवरून दिमाखात येतो. त्याला पाहताच एक मुलगी त्याच्याशी काहीतरी बहाणा करून बोलण्यास जाते. असा काहीसा या मालिकेचा मजेशीर प्रोमो पाहायला मिळत आहे. एक कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर आणि गावरान मुलगी यांच्यामधली प्रेमकथा या मालिकेत पाहायला मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 

या मालिकेत फ्रेश जोडी दिसत असून या दोघांव्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार या मालिकेत झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ही मालिका लवकरच कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. 

Recommended

Loading...
Share