By  
on  

...तर अमिताभ बच्चन दिसले असते मराठी रंगभुमीवर

कलर्स मराठीवर दोन स्पेशल कार्यक्रम सध्या बराच चर्चेत आहे... सगळ्यांनाच आपल्या लाडक्या आणि नावाजलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यांच्या आयुष्यात हळूच डोकावून बघायला आपल्या सगळ्यांनाच खूप आवडते. ही मंडळी त्यांच्या खर्‍या आयुष्यात कश्या आहेत, त्यांची सुख - दु:ख, भावुक करणार्‍या गोष्टी, त्यांचा इथवरचा प्रवास कसा होता, या मंडळी प्रसिद्धीच्या शिखरावर कसे बरे पोहचले असतील ? आणि बरच काही... नुकतीच या कार्यक्रमात प्रशांत दामले आणि कविता मेढेकर-लाड यांनी हजेरी लावली. 

प्रशांत दामले म्हणाले,"एकदा नाट्यनिर्माते सुधीर भटांनी अमिताभ बच्चन यांना फोन केला. आमच्याकडे एक नाटक आहे तुम्ही त्यात काम करणार का? असे त्यांनी विचारले. या नाटकाचं नाव होतं 'आप्पा आणि बाप्पा' . यापुढे सुधीर भटांनी मी नाटकाची स्क्रिप्ट पाठवतो असंही बच्चन सरांना सांगीतलं." हा किस्सा ऐकुन जितेंद्र जोशीला हसु अनावर झाले. 

तेव्हा सुधीर भट यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेली बोलणी होकारात बदलली असती तर भारतीय सिनेसृष्टीचा हा महानायक मराठी रंगभुमीवर दिसला होता. लवकरच अमिताभ बच्चन हे 'एबी अँड सीडी' या मराठी सिनेमात झळकणार आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive