By  
on  

अग्गबाई! अभिजीत आणि आसावरी प्रेमाच्या सायकलवर

झी मराठीवरील 'अग्गबाई सासूबाई' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यामधील निवेदिता जोशी-सराफ यांनी साकारलेली आसावरी आणि गिरीश ओक यांनी रंगवलेली अभिजीत या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झाल्या आहेत. आसावरी आणि अभिजीत यांची हळुवार प्रेम कहाणी आता थोडी पुढे सरकणार आहे. 

झी मराठीवरील 'अग्गबाई सासूबाई'च्या नव्या प्रोमोमध्ये आसावरी आणि अभिजीत टॅक्सिमधून प्रवास करताना त्यांची टॅक्सी वाटेवर पंक्चर होते. त्यानंतर अभिजीत आसावरीसाठी सायकलची व्यवस्था करतो. ही सायकल छानपैकी सजवलेली असते. त्यानंतर नकळत एकमेकांचा स्पर्श होऊन आसावरी सायकलवर बसते  त्यानंतर अभिजीत आणि आसावरी एकत्र सायकलवर बसून घरी जातात. असा एक लव्हेबल प्रोमो पाहायला मिळत आहे. 

 

या प्रोमोमधून आसावरी आणि अभिजीतचं प्रेम पुढे सरकत असल्याची चाहूल प्रेक्षकांना लागली आहे. झी मराठीवरील 'अग्गबाई सासूबाई'  ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता प्रेक्षकांना प्रसारित होत आहे. गिरीश ओक, निवेदिता सराफ-जोशी, तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की आणि रवी पटवर्धन यांच्या या मालिकेत प्रमुख भूमिका आहेत. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive