आईच्या भावविश्वावर आधारलेली मालिका ‘ आई कुठे काय करते’

By  
on  

प्रत्येक घराला घरपण मिळतं ते आईमुळे. आई घरातील प्रत्येकाला घराशी बांधून ठेवते. आई घरासाठी दिवसरात्र राबत असते. पण अनेकदा तिला घरी बसून काय कम असतं हा विचार केला जातो. अशा वेळी आईच्या भावविश्वात किती खळबळ होत असावी याचा विचार केला जात नाही. असाच विषय घेऊन स्टार प्रवाहवर एक नवी मालिका रसिकांच्या भेटीला आली आहे.

‘आई कुठं काय करते’ असं या नव्या मालिकेचं शीर्षक आहे. या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये मधुराणी प्रभुलकर दिसत आहे. ही मालिका लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.

 

Recommended

Loading...
Share