Video: 'विठु माऊली' साकारणारा अजिंक्य राऊत फॅनच्या प्रेमाने गेला भारावुन

By  
on  

स्टार प्रवाह वाहीनीवरील 'विठु माऊली' ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. उत्कंठावर्धक कथानक आणि संपुर्ण महाराष्ट्राचं दैवत असलेल्या पंढरपुरच्या विठ्ठलाची कहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 'विठु माऊली'ची भुमिका साकारणा-या अजिंक्य राऊतवर महाराष्ट्रातुन प्रेमाचा वर्षाव होत आहे. अशाच एका फॅनची भेट अजिंक्यला झाली. 

साधारणतः वयाची साठी पार केलेल्या आजी थेट पनवेलवरुन विठु माऊलीच्या सेटवर आल्या होत्या. अजिंक्यला भेटुन त्यांनी त्याच्या भुमिकेची कौतुक केलं. अजिंक्यची या चाहती न चुकता 'विठु माऊली'चे सर्व भाग पाहतात. आणि एखादा भाग चुकून बघायचा राहुन गेला तर दुस-या दिवशी त्या बघतात. अजिंक्यने साकारलेलं विठ्ठलाचं रुप त्यांना आवडतं. 

अजिंक्यने सुद्धा या आजींच्या प्रेमाचा स्वीकार केला. आणि तो भारावुन गेला. स्टार प्रवाहवरील 'विठु माऊली' ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

Recommended

Loading...
Share