By  
on  

मिसेस मुख्यमंत्रीने गाठला 200 भागांचा टप्प, टीमने केला जल्लोष

मुख्यंमत्री होण्याचं स्वप्न पाहून जनहितासाठी धडपडणारा समर आणि प्रत्येक कठीण प्रसंगात त्याच्या पाठीमागे त्याला खंबीर साथ देणारी सुमी ह्यांची कहाणी अल्पावधीतच सिनेरसिकांनी डोक्यावर घेतली. सासूबाई आणि मामे सास-यांच्या प्रत्येक कुरघोडी परतून लावत चांगलीच जिरवणारी सुमी आज प्रेक्षकांची लाडकी आहे.

 

घराघरांत हक्काचं स्थान निर्माण करणा-या 'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेने नुकताच यशस्वी 200 भागांचा टप्पा गाठला आहे. 

अभिनेत्री श्वेता शिंदेने या मिसेस मुख्यमंत्री या मालिकेची निर्मिती केली आहे. प्रमुख भूमिका साकारणारे अमृता धोंडगे आणि तेजस बर्वे यांनी संपूर्ण टीमसोबत व निर्माती श्वेता यांच्यासह केक कापून हा जल्लोष साजरा केला. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive