By  
on  

जंगल जंगल पता चला है....पुन्हा ९० च्या दशकातलं 'जंगल बुक' रसिकांच्या भेटीस

लॉकडाऊनमध्ये भारतात पुन्हा जुन्या मालिका प्रसारित करण्याची जबरदस्त लाट उसळली आहे. घरबसल्या त्या जुन्या आठवणींमध्ये रममाण होण्याची संधी मिळतेय. आता पुन्हा आपल्याला रविवारचे ते जुने दिवस जगण्याची संधी मिळणार आहे. जंगल जंगल पता चला है... चड्डी पेहन के फुल खिला है , गोड गाणं म्हणजेच जंगल बुक ही कार्टून फिल्म पुन्हा रसिकांच्या भेटीला येत असून ९० च्या दशकातील सर्वांनाच ह्यामुळे आनंदाला उधाण आलं आहे.

सरकारने प्रेक्षकांच्या मागणीनुसार ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘शक्तिमान’, ‘ब्योमकेश बक्षी’, ‘सर्कस’, ‘फौजी’, ‘श्रीमान श्रीमती’ या मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली. पण सर्वांच्या लाडक्या मोगलीची बातच काही और. दूरदर्शनच्या ट्विटरवरुन  ‘तुमचा आवडता शो जंगल बुक ८ एप्रिल पासून दुपारी १ वाजता दूरदर्शनवर प्रदर्शित होणार आहे’ असे म्हटले आहे.

आता पुन्हा एकदा ‘मोगली’, ‘बगिरा’ आणि ‘शेरखान’ मित्रांचं त्रिकुट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे सर्वजण उत्सुक आहेत. ९० च्या दशकातील सर्वांना आपलं बालपण यामुळे डोळ्यासमोर उभं राहणार आहे.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive