By  
on  

गुड न्यूज : उन्हाळ्याची सु्ट्टी आणखी मजेदार, 'मोगली'नंतर 'छोटा भीम' दूरदर्शनवर

करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन काळ तब्बल ३ मेपर्यंत वाढवण्याच्या निर्णय घेतला आहे. करोनाला हरवण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. परंतु घरबसल्या वैतागलेल्या नागरिकांच्या मनोरंजनासाठी सरकारने एक नामी शक्कल शोधून काढली, ती म्हणजे जुन्या मालिकांचं पुन्हा प्रक्षेपण.

रामायण , महाभारत, चिमणराव-गुंड्याभाऊ, देख भाई देख, ब्योमकेश बक्षी असे अनेक जुन्या गाजलेल्या मालिकांनंतर बच्चेकंपनींसाठी आणि ९० च्या दशकांतील बच्चेकंपनींच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मोगली पुन्हा भेटीला आला.आता बच्चेकंपनींसाठी पुन्हा एक गुड न्यूज आहे, ती म्हणजे लाडका छोटा भीम आता दूरदर्शनवर भेटीला येतोय. 

दूरदर्शन वाहिनीच्या अधिकृत ट्विटर हँडरवरुन याबाबत माहिती देण्यात आली. दररोज दुपारी २ वाजता ‘छोटा भीम’ ही कार्टून मालिका दूरदर्शनवर प्रसारीत केली जाईल. हे कार्टून पोगो वाहिनीवर सुद्धा दाखवले जाते. यापूर्वी ‘जंगल बुक’ हे कार्टून सुरु करण्यात आले होते.

 

 

बच्चेकंपनींना घरात बसून निश्चितच कंटाळा आला आहे, पण हे असे धम्माल मनोरंजनाचे नजराणे मिळत असतील तर ते एका जागी स्थिर राहतील यात शंका नाही.  या कार्यक्रमांमुळे दूरदर्शन वाहिनी आता पुन्हा एकदा सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या वाहिन्यांमध्ये क्रमांक एकवर पोहोचली आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive