प्रेक्षकांसाठी खुशखबर ! 'रामायण', 'महाभारत' नंतर आता श्रीकृष्ण सुध्दा येणार भेटीला

By  
on  

आज सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. करोना संकटाशी लढण्यासाठी सरकार युध्द पातळीवर काम करत आहे. पण घरात बसून सुरक्षित राहण्याचं आवाहन वेळोवेळी सरकारकडून देशवासियांना केलं जात आहे. मग घरी बसून कंटाळलेल्या प्रेक्षकांसाठी सरकारनेच एक नामी शक्कल शोधून काढली,

रामायण, महाभारत यासारख्या ९० च्या दशकात गाजलेल्या मालिका पुन्हा प्रसारित करुन रसिकांकडून कौतुक मिळवलं. रामायण, महाभारत यांसारख्या प्रसिद्ध मालिकांनंतर दूरदर्शन लवकरच श्री कृष्ण ही मालिकाही पूर्नःप्रक्षेपित करणार आहे. या पौराणिक मालिका प्रेक्षकांच्या विशेष आवडीच्या आहेत.या मालिकांवर प्रेक्षक आजही भरभरुन प्रेम करतायत.

रामायण सागर यांची रामायण ह्या मालिकेत उत्तर रामायणाचं पर्व सुरू झालं आहे. यानंतर श्रीकृष्णा ही प्रसिद्ध मालिका प्रक्षेपित केली जाणार आहे. १९९६ मध्ये ही मालिका पहिल्यांदा प्रक्षेपित झाली होती. रसिकांनी या मालिकेवर खुप प्रेम केलं. 

 श्रीकृष्ण मालिकेत आपल्याला लाडका अभिनेता स्वप्निल जोशी पुन्हा पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांसाठी एक पर्वणीच आहे. 
 

Recommended

Loading...
Share