By  
on  

'ससुराल सिमर का' फेम अभिनेता आयसीयुमध्ये,उपचारांसाठी नाहीयेत पैसे

सध्या संपूर्ण जग हे करोना संकटाशी झुंज देत आहे. सर्वच वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स, सफाई कामगार, सरकारी यंत्रणा या युध्दपातळीवर लढत आहेत.तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार हे ठप्प झाले आहेत. त्यामुळे इतर छोटे-मोठे कलाकार व पडद्यामागच्या तंत्रज्ञ म्हणून काम करणा-या कर्मचा-यांचे अतोनात हाल होत आहेत. तसंच या लॉकडाऊनमध्ये कलाकारांनी आत्महत्या करण्यासारख्या घटनासुद्दा समोर आल्या आहेत. 

या दरम्यानच  आता 'ससुराल सिमर का' आणि 'कुछ रंग प्यार के' अशा मालिकांमध्ये काम केलेले अभिनेता आशीष रॉय यांनी लोकांकडे मदत मागितली आहे.अनेक दिवसांपासून आशीष रॉय यांची तब्येत खालावलेली आहे. त्यांना आयसीयूमध्ये  दाखल करण्यात आलं आहे.ते डायलसिसवर आहेत.  आजारपणासोबतच त्यांच्यासमोर आर्थिक संकटही आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत लोकांकडून आर्थिक मदत मागितली .

आशिष यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटलं,  ते फार आजारी असून ते डायलेसिसवर आहेत. शिवाय सध्या ते आयसीयूमध्ये आहेत. अजून एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की त्यांना तात्काळ पैशांची गरज आहे.

 

 

२०१९ मध्ये त्यांना पॅरेलिसीसचा अटॅक आला होता. यातून बाहेर पडल्यानंतर त्यांना मालिकांमध्ये कोणीही काम दिलं नसल्याने त्यांनी आपल्या जमापुंजीवर घरखर्च चालवला. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive