By  
on  

मिसेस मुख्यमंत्री फेम समरने बाप्पासाठी खास तयार केला मोदकांचा नैवैद्य

लॉकडाऊन जवळपास दोन महिन्यांच्या वर उलटून गेला आहे. त्यामुळे आता घरी बसण्याचा प्रत्येकालाच वैताग येऊ लागलाय. कधी एकदा आपण आपल्या आधीच्या रुटीनला लागतोय, असे वेध प्रत्येकाला लागले आहेत.यात सेलिब्रिटींचीसुध्दा काही निराळी त-हा नाही. त्यांनासुध्दा पुन्हा कधी एकदा शूटींग सुरु होतोय असं झालं आहे. 

मिसेस मुख्यमंत्री फेम समर म्हणजेच अभिनेता तेजस बर्वे हा सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतो. अनेक नानाविध पोस्ट करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकतीच मंगळवारी संकष्टी चतुर्थी होती. यानिमित्त बाप्पासाठी तेजसने आईसोबत मिळून खास उकडीच्या मोदकांचा नैवेद्य बाप्पाला अर्पण केला.

तेजस पोस्टमध्ये म्हणतो, Lockdown संपत आलं तसं countdown सुरु झालं...आणि चतुर्थी निमित्त आईच्या हातच्या जगात भारी..मोदकांचा बेत झाला ...! I'm sorry सर्वांग सुंदर मोदक ! मी पण 2-4 केले (Photo त कळेलच... ) तर... काहीच दिवसांत shoot सुरु होईल.... .

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive