By  
on  

Corona Virus: टिव्ही कलाकार आणि क्रू मेंबर्सचा करोनामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार 25 लाख रुपये

शुटिंग सुरु करण्याच्या मुद्द्यावरून फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज आणि सिने ऐंड टेलीविजन आर्टिस्ट्स एसोसिएशन ने कलाकारांसाठी सेटवर सुरक्षेची मागणी केली होती. यावरून आता शुटिंगशी संबंधित कलाकार टेक्निशिअन किंवा इतर मेंबरचा करोनामुळे मृत्यू झाल्यास 25 लाखाचा कव्हर दिला जाईल. 

तर केवळ संक्रमण झाल्यास 2 लाखाचं विमा कव्हर दिलं जाईल. Indian Film and Television Producers Council चे मुख्य अधिकारी जे.डी मजेठिया म्हणतात, ‘ या महत्त्वाच्या बाबीवर तोडगा निघाला याचं समाधान आहे.’ IFTPC यावेळी शासनाच्या सर्व गाईडलाईन्सचं पालन करण्याचं आश्वासन दिलं आहे. हा विमा संबंधित कलाकारला 30 दिवसांच्या आत देणं गरजेचं आहे. याशिवाय कर्मचा-यांना प्रवास भत्ता देणंही गरजेचं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive