By  
on  

नव्या मालिकेत एकत्र झळकतायत मिताली मयेकर आणि स्मिता तांबे

करोना संकट आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जवळपास दोन-तीन महिने सर्व मालिका व सिनेमांचं शूटींग ठप्प होतं. त्यामुळे आपल्या लाडक्या मालिकांचे नवे भाग पाहता येत नव्हते. त्यानंतर अनलॉकमध्ये मालिकांच्या शूटींगला परवानगी मिळाली आणि लाडक्या मालिका नव्या भागांसह आणि ट्विस्टसह प्रेक्षकांच्या दिमतीला हजर झाल्या. पण त्यासोबतच आणखी एक महत्त्वाचा बदल दिसला तो म्हणजे, अनेक नवनव्या मालिका रसिक प्रेक्षकांना भेटण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

देवमाणूस ही मालिका झी मराठीवर आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय, दरम्यान आणखी एका नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच झळकला आहे. 'लाडाची मी लेक गं' असं या नव्या को-या मालिकेचं नाव असून अभिनेत्री मिताली मयेकर या मालिकेत नायिका साकारते आहे. तसंच सशक्त अभिनेत्री स्मिता तांबेसुध्दा या मालिकेत महत्त्वपू्ण भूमिकेत असल्याने दोघींच्याही अभिनयाची जुगलबंदी पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

लोभ असावा. #ladachimilekg #newwork #bappamoraya #zeemarathi #mitalimayekar

A post shared by Mitali Mayekar (@mitalimayekar) on

 

उर्फी या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री मिताली मयेकरने यापूर्वी  झी युवावरील फ्रेशर्स या लोकप्रिय मालिकेत भूमिका साकारली होती.  पण नायिका म्हणून 'लाडाची मी लेक गं' ही तिची पहिलीच मालिका असल्याने ती प्रचंड उत्साही असल्याचं पाहायला मिळतंय. तिनेच आपल्या सोशल मिडीयावरुन या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला. 

तर मराठी तसंच हिंदीत आपल्या दमदार अभिनयाची चुणूक दाखवणा-या स्मिता तांबेला या मालिकेत पाहणं एक पर्वणीच ठरेल. प्रोमोवरुन स्मिताच्या भूमिकेला ग्रे शेड असल्याचं जाणवतं. त्यामुळेच ही मालिका पाहण्याची उत्कंठा वाढलीय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive