कपिल शर्मा शोमधील नवज्योत सिंह सिध्दूच्या जागी आता अर्चना पुरन सिंह

कपिल शर्माच्या शोमधून नवज्योत सिंह सिध्दू यांना बाहेरचा रस्ता, अभिनेत्री अर्चना पुरन सिंह बनली नवीन जज

कपिल शर्माच्या शोमध्ये नवज्योत सिंह सिध्दू नेहमीच जजच्या खुर्चीवर विराजमान होताना आणि सेलिब्रिटींच्या विनोदावर खळखळून हसताना आपण पाहतो. कपिल शर्मा शोमधून नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्री अर्चना पुरन सिंहने सिध्दूची जागा घेतली आहे. टीव्ही सूत्रांच्या माहितीनुसार अर्चनाने या शोच्या दोन एपिसोडचं शूटींगसुध्दा पूर्ण केलं आहे.

तुम्हाला माहित असेलच जम्मू-काश्मिर येथील पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्यात भारताचे 42 जवान शहीद झाले. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली. पाकिस्तानला धडा शिकवा. पाकिस्तानचा बदला घ्या असंच सर्वजण सोशल मिडीया आणि सर्वत्र बोलताना पाहायला मिळतायत. यातच सिध्दू महाशयांनी एक वक्तव्य करत आपल्या अकलेचे तारे तोडले. काही लोकांच्या कारनाम्यामुळे आपण संपूर्ण देशाला जबाबदार ठरवू शकत नाही आणि यावरुन सर्वच स्तरातील लोक खवळले. हे वादग्रस्त वक्तव्य कोणालाच पटलेलं नाही. तीव्र शब्दांत सिध्दूवर सोशल  मिडीयावर कमेंट्स वाचायला मिळतायत. आण हेच त्याला हे शो सोडण्यास भाग पडल्याचं आपल्याला दिसतंय.

 

 

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of