पाहा Photos : स्वप्नवत वाटणारा विक्रांत-इशाचा भव्य-दिव्य लग्नसोहळा

मालिकेतील कथानकात आवडत्या जोडीचं लग्न व्हावं ही प्रेक्षकांची इच्छा असते. हा मालिकेच्या चाहत्यांसाठी सगळ्यात आनंददायी सोहळा असतो. अशाच एका जोडीचं शुभमंगल होणार आहे. ही जोडी म्हणजे ईशा आणि विक्रांत. 

सध्या मालिका विश्वात ट्रेंडमध्ये असणारा सोहळा म्हणजे ईशा आणि विक्रांतचा लग्नसोहळा. काहीशा हटके असलेल्या या विवाहसोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी रसिक आतुरले आहेत.

तुला पाहते रे या मालिकेतील ईशा आणि विक्रांत या जोडीची प्रेमकहाणी रसिकांना आवडली आहेच. पण या जोडीचं लग्न कधी होणार याची प्रतिक्षाही आहे.

अनंत अडचणींमधून मार्ग काढत ईशा आणि विक्रांतला त्यांचं प्रेम गवसलं आहे.

मालिकेतील कथानकात आवडत्या जोडीचं लग्न व्हावं ही प्रेक्षकांची इच्छा असते

हा मालिकेच्या चाहत्यांसाठी सगळ्यात आनंददायी सोहळा असतो. अशाच एका जोडीचं शुभमंगल होणार आहे. ही जोडी म्हणजे ईशा आणि विक्रांत.

प्रेमाला वय नसतं ही वेगळी टॅगलाईन घेऊन सुरु झालेल्या या प्रेमकहाणीचा महत्त्वाचा ट्प्पा आता आला आहे. ईशा निमकर आणि विक्रांत सरंजामे यांच्या आगळ्यावेगळ्या नात्याला आता लग्नाच्या रुपाने नवं नाव मिळत आहे.

 

या लग्नादरम्यान आलेले मायरा, झेंडे, टिल्लू यांचे अडथळे पार करत, ईशाच्या बाबांचं मन जिंकून विक्रांत सरंजामे आता निमकरांचा जावई होणार आहे.

 

या सोहळ्यातील काही क्षणचित्र समोर आली आहेत. ती पाहण्याची संधी अजिबात सोडू नका.

यावेळी इशाच्या मेहेंदी आणि संगीत सोहळ्याचे तसेच विवाहविधीचे फोटोही समोर आले आहेत. यावेळी लाडक्या लेकीचं कन्यादान करताना निमकरांच्या चेह-यावरील व्याकुळताही खुप काही सांगून जाते.

सरंजामे कुटुंबिय मात्र सध्या खुषीत आहेत. इशासारखी गुणी मुलगी विक्रांतच्या आयुष्यात येणार म्हटल्यावर आईसाहेबांनाही खुप आनंद झाला आहे.

13 जानेवारीला हा लग्नसोहळ्याचा विशेष भाग प्रेक्षकांना झी मराठीवर पाहता येईल.

 

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of