‘लिफ्टमॅन’ भाऊ कदम येतोय त्याची पहिली वेबसिरीज घेऊन

‘लिफ्टमॅन’ या नव्या-को-या वेबसिरीजद्वारे भाऊ कदम लिफ्टमॅनच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. एखाद्या ऑफिसचा लिफ्टमॅन प्रत्येक कर्मचा-यांसाठी महत्त्वाचा असतो.

अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसायला लावणारा विनोदवीर भाऊ कदम नेहमीच आपल्यासमोर विविध रुपात येत असतो.‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील तो साकारत असलेली बहुढंगी पात्रं घराघरांत लोकप्रिय झाली आहेत. भाऊ कदम म्हणजे फक्त धम्माल असं जणू समिकरणच झालं आहे. भाऊचे विनोद म्हणजे एक पर्वणीच असते. आता एका नव्या माध्यमाद्वारे भाऊच्या विनोदाची मज्जा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

‘लिफ्टमॅन’ या नव्या-को-या वेबसिरीजद्वारे भाऊ कदम लिफ्टमॅनच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. एखाद्या ऑफिस बिल्डिंगचा लिफ्टमॅन प्रत्येक कर्मचा-यांसाठी महत्त्वाचा असतो. दररोज येणारे-जाणारे यांच्यासोबत त्याची भेट घडत असते. यादरम्यान भाऊ हा अतरंगी लिफ्टमॅन काय धुडगूस घालतो, हे पाहणं मजेशीर असेल. या वेबसिरीजद्वारे पहिल्यांदाच पॉला देखील झळकणार आहे.

भाऊ कदमची ‘लिफ्टमॅन’ ही वेबसिरीज 26 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. ही वेब सिरीज झी मराठी ओरिजनलच्या झी 5 चे सबस्क्रिप्शन घेतल्यावर पाहायला मिळणार आहे.