आयुष्याचा हटके पध्दतीने वेध घेणारी गोष्ट ‘फुल टाईट’ या वेब सिरिजमधून अनुभवा

कुटुंबाची हलकी-फुलकी व आयुष्याचा हटके पध्दतीने वेध घेणारी गोष्ट ‘फुल टाईट’ या वेब सिरिजमधून अनुभवता येईल.‘सोनी लिव’वर ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे.

सध्या वेब सिरिजचा जमाना आहे. आजकाल प्रत्येकाला आपल्या स्मार्टफोनमध्ये वेब सिरिजचा आनंद घ्यायला आवडतो. इंग्रजी आणि हिंदीसोबतच मराठी वेबसिरिजही यात मागे नाहीत. मराठी वेब सिरिजच्या दुनियेत ‘फुल टाईट’ ही एक अनोखी कौटुंबिक वेब सिरिज सुरु होत आहे.

एक आदर्श कुटुंबातील मुलाचे त्याच्या पालकांसोबत नानाविविध विषयांवरुन वाद होत असतात. या कुटुंबाची हलकी-फुलकी व आयुष्याचा हटके पध्दतीने वेध घेणारी गोष्ट ‘फुल टाईट’ या वेब सिरिजमधून अनुभवता येईल.

‘सोनी लिव’वर ही वेब सीरिज प्रदर्शित झाली असून १८ जुलै रोजी पहिला भाग प्रसारित झाला. ‘फुल टाइट’ या सात भागांच्या वास्तवदर्शी मालिकेचे दिग्दर्शन श्रीपाद पवारने केलं असून विजय बारसे यांनी निर्मिती केली आहे. या वेब सीरीजमध्ये यतीन कार्येकर आणि स्नेहा रायकर यासारखे लोकप्रिय कलाकार प्रमुख भूमिकेत झळकत आहेत. त्यांच्याबरोबरच अक्षय केळकर, सायली साळुंखे, वनश्री जोशी आणि सुमुखी पेंडसे आदी कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील.