'वन बाय टू' मराठी वेब सिरीजमध्ये या कलाकारांच्या प्रमुख भूमिका

By  
on  

जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक जे लॉयल नसतात आणि दुसरे जे लॉयल असल्याचा आव आणतात. याचाच अर्थ या जगात completely लॉयल कोणीचं नसतं, असंच काहीसं चित्र या वेबसिरीज मध्ये पाहायला मिळणार आहे. रिलेशनशिप मध्ये दोन्ही बाजू जर लॉयल असतील तर ते रिलेशन खूप चांगलं टिकतं असं म्हणतात. पण जर त्याच लॉयलटीची माँ कि आँख झाली तर? काय-काय मजा मस्ती आणि घडामोडी घडतात, हेच या सिरीजमध्ये बघायला मिळेल. निखिल रायबोले, भूपेंद्रकुमार नंदन यांच्या कॅफेमराठी प्रस्तुत आणि बाप फिल्म्स, रिझॉन्स स्टुडिओ निर्मित "वन बाय टू" हि मराठी वेबसिरीज १९ नोव्हेंबरपासून एमक्स प्लेअर, एअरटेल एक्सट्रिम आणि व्हीआय मूव्हीज म्हणजेच वोडाफोन प्ले या ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज झाली आहे. या वेब सिरीजचे लेखन आणि दिग्दर्शन निशांत गजभे आणि रोहित निकम यांनी केले आहे.

याबद्दल निखिल रायबोले सांगतात की, आज प्रदर्शित होणारी 'वन बाय टू' हि कॅफेमराठीची १५वी मराठी वेब सिरीज आहे. डिजिटल क्षेत्रात स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण करण्यासाठी आम्ही नव्या कल्पना, नव्या गोष्टी आणि नव्या विचारांना वाट मोकळी करून देणाऱ्या लेखकांची फौज तयार करतोय. सोबतच बड्या दिग्दर्शकांचा देखील त्यात समावेश असणार आहे. मी अधिकाधिक तरुणांना आवाहन करेल कि, त्यांनी या मनोरंजन क्षेत्राकडे व्यवसाय म्हणून बघावे. या 'वन बाय टू' वेब सिरीजमध्ये रोहित निकम, शिवानी सोनार, अनामिका डांगरे, श्रेयस गुजार, आदित्य हविले, आरोही वकील, रवींद्र बंदगार आणि अभय महाजन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या वेबसिरीजच्या माध्यमातून कलर्स मराठी वाहिनीवरील 'राजा राणीची गं जोडी' या मालिकेतील अभिनेत्री शिवानी सोनार डिजिटल विश्वात पदार्पण करत आहे. एक वेगळ्या आणि आकर्षक अशा भूमिकेत शिवानी सोनार दिसणार आहे.

 

भुपेंद्रकुमार नंदन सांगतात की, आपल्या आयुष्यात असणारे प्रत्येक नाते हे दोन गोष्टींवर टिकून असते ते म्हणजे लॉयलटी म्हणजेच खरेपणा आणि विश्वास. पण सध्याच्या जगात किंवा सध्याच्या युथ जनरेशन मध्ये या दोन्ही गोष्टी नष्ट होताना दिसत आहेत. अशाच प्रेमाच्या लॉयलटीवर आधारित हि 'वन बाय टू' मराठी वेब सिरीज नक्कीच आजच्या तरुण वर्गाला आवडेल यात शंका नाही. 

Recommended

Loading...
Share