‘समांतर 2’च्या टीमचं पाचगणीमध्ये शूटींग सुरु

By  
on  

‘समांतर’ या सुपरहिट वेब सीरिजनंतर त्याचा पुढील भाग म्हणजेच ‘समांतर 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या भागाची रसिक प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.  या आगामी सीरिजच्या माध्यमातून पहिल्या भागाप्रमाणेच  स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या सीरिजच्या शूटींगमधले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसंच अभिनेता स्वप्निल जोशी हा त्याच्या सोशल मिडीयावरुन सतत काही ना  काही अपडेट्स चाहत्यांपर्यंत पोहचवत असतो. त्यामुळे या सीरिजची उत्सुकता शिगेला पोहचलीय.  सध्या या सीरिजचं पाचगणीमध्ये शूटींग सुरू आहे.

‘समांतर 2’ मध्येसुध्दा    स्वप्नील जोशी आणि नितीश भारद्वाज यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. सध्या या सीरिजचं पाचगणीमध्ये चित्रीकरण सुरु असून या सेटवरील काही फोटो समोर आले आहेत. ‘समांतर’ या वेब सीरिजच्या माध्यमातून ‘जीसिम्स’ने वेब विश्वात पदार्पण केले आहे.

Recommended

Loading...
Share