When a Man Loves a Woman Review: अनपेक्षित शेवट असलेला वरुण सोबती आणि गिरीजा ओकची हटके शॉर्टफिल्म

By  
on  

 

शॉर्ट फिल्म : When a Man Loves a Woman

कलाकार: वरुण सोबती, गिरिजा ओक 

दिग्दर्शक: सई देवधर 

माध्यम: युट्युब 

रेटिंग: 3 Moons

 

वरुण सोबती आणि गिरीजा ओक पहिल्यांदाच ‘When a Man Loves a Woman’ या शॉर्टफिल्मसाठी एकत्र आले आहेत. सई देवधरने या शॉर्ट फिल्मचं दिग्दर्शन केलं आहे. ही शॉर्ट फिल्म मारिया आणि पीटर या विवाहित जोडप्याभोवती फिरते. 
मारियाच्या व्यक्तिरेखेत गिरिजा आहे तर पीटरच्या व्यक्तिरेखेत वरुण आहे. मारिया त्याला सकाळी उठवून खास दिवसासाठी तयार व्हायला सांगते.

 

वरुण तयार होताना एका प्रेमळ पत्नी प्रमाणे त्याला मदत करते. पण वरुण संध्याकाळी घरी आल्यानंतर मात्र या गोष्टीला हटके कलाटणी मिळते. या स्टोरीच्या शेवटापर्यंत प्रेक्षकाला अंदाज आला असतो की पुढे काय घडणार. पण कलाकारांचा अभिनय यात खिळवून ठेवतो. गिरिजाने मारिया उत्तम साकारली आहे. तर शांत, समंजस आणि प्रेमळ पीटर वरुणने साकारला आहे. सईच्या दिग्दर्शनाने पटकथेत खास रंग भरले आहेत. ही हटके शॉर्टफिल्म प्रेमात असलेल्या प्रत्येकाने पाहायला हवी. 
पीपिंगमून या शॉर्टफिल्मला देत आहे 3 मून

Recommended

Loading...
Share