बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘फॅमिली मॅन’ च्या दुस-या सीझनचा ट्रेलर उद्या होणार रिलीज

By  
on  

मनोज वाजपेयींची मुख्य भूमिका असलेली फॅमिली मॅन या सिरीजच्या दुस-या सीझनची नांदी झाली आहे. पण अनेकदा या सिरीजची रिलीज डेट पुढे गेली. पण आता उत्सुकता संपली असून या सिरीजचा ट्रेलर उद्या रिलीज होतो आहे. नव्या सीजनमध्ये, देशाचा श्रीकांत तिवारी उर्फ मनोज बाजपेयी, अखेरीस आपल्या बहुप्रतीक्षित एक्शन स्पाई थ्रिलरसोबत परतत आहे. या वेळी, हा संघर्ष, अधिक इंटेंस असणार आहे. 

 

 

कारण हा आता केवळ आपले कुटुंब आणि डिमांडिंग प्रोफेशनल आयुष्य यांच्या संतुलनासाठीचा संघर्ष असणार नाही तर, त्याला एका नव्या 'राजी' (सामंथा अक्किनेनी) शी दोन हात करावे लागणार आहेत.अमेझॉन ओरिजिनल सीरीजसोबत दक्षिण सुपरस्टार सामंथा अक्किनेनी आपला डिजिटल डेब्यू करत आहे.

या सिरीजमध्ये मनोज वाजपेयी, प्रियामणि यांच्या सोबत शारिब हाशमी, सीमा विश्वास, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकुर यांच्याही भूमिका आहेत. फॅमिली मॅन ही मध्यमवर्गीय श्रीकांत तिवारीची कहाणी असून तो शोध पथकाच्या एका विशेष टीमसोबत काम करतो. या सीरीजमध्ये श्रीकांतचे मध्यमवर्गीय जीवन दाखवण्यात आले असून ज्यामध्ये सीक्रेट्स, कमी उत्पन्न, मोठ्या जबाबदारीची नोकरी त्यातील दडपण आणि एक पति आणि पिता यांमध्ये बॅलॅन्स आणण्यासाठीची धडपड दिसून येते आहे.

Recommended

Loading...
Share