'हंगामा प्ले'च्या आगामी वेबसिरीजमध्ये झळकणार प्रियदर्शन जाधव आणि सुरभी हांडे

By  
on  

अनोखी विनोदी स्‍टाइलसाठी ओळखला जाणारा पुरस्‍कार-विजेता अभिनेता प्रियदर्शन जाधव हंगामा प्‍लेचा आगामी मराठी ओरिजिनल शो 'कट्यार'मध्‍ये दिसणार आहे. शोची पटकथा अजून उलगडली नसली तरी हा शो हॉरर-कॉमेडी असण्‍याची शक्‍यता आहे. या शोमध्‍ये प्रमुख भूमिकेत सुरभी हांडे आणि सायली पाटील हे कलाकार देखील आहेत. तसेच राष्‍ट्रीय पुरस्‍कार विजेता शिवाजी लोटन पाटील यांनी या शोचे दिग्‍दर्शन केले आहे.

शोमधील भूमिकेबाबत बोलताना प्रियदर्शन जाधव म्‍हणाला, ''मला सांगताना आनंद होत आहे की, आम्‍ही नुकतेच हंगामाचा नवीन मराठी ओरिजिनल शो 'कट्यार'साठी शूटिंगला सुरूवात केली आहे. या शोमध्‍ये शिवाजीसोबत काम करण्‍याचा अभिमान वाटत आहे. या शोची पटकथा रोमांचक आहे आणि भारतात आतापर्यंत अशा प्रकारची शैली दिसण्‍यात आलेली नाही. मी आशा करतो की, आम्‍ही शूटिंग करताना केलेल्‍या मौजमजेप्रमाणेच प्रेक्षक देखील हा शो पाहण्‍याचा आनंद घेतील.''

मराठी मालिका 'जय मल्‍हार'मधील उत्‍तम भूमिकेसाठी ओळखली जाणारी सुरभी हांडे म्‍हणाली, ''मला टेलिव्हिजनवर आयकॉनिक भूमिका साकारण्‍याचा अभिमान वाटत असला तरी माझी नेहमीच माझे कौशल्‍य वाढवण्‍याची आणि विविध मीडियावर विविध प्रकारच्‍या भूमिका साकारण्‍याची इच्‍छा आहे. 'कट्यार'साठी शूटिंग करताना मला या डिजिटल शोसाठी विनोदीशैली साकारण्‍याची संधी मिळाली आहे. या भूमिकेला कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो हे पाहण्‍यासाठी मी खूपच उत्‍सुक आहे.''

सायली पाटील म्‍हणाली, ''क्षेत्रातील अशा प्रतिभावान व लोकप्रिय चेह-यांसोबत काम करण्‍याची संधी मिळाल्‍याचे अहोभाग्‍य आहे. शोची पटकथा आगळीवेगळी आहे आणि मी प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहण्‍यासाठी खूपच उत्‍सुक आहे.''

शिवाजी लोटन पाटील म्‍हणाले, ''मला डिजिटल शोचे दिग्‍दर्शन करण्‍याचा आनंद होत आहे. यामधून मला माझी क्रिएटीव्‍हीटी सादर करण्‍याची मोकळीक मिळते. पटकथा आणि कलाकार प्रेक्षकांना संपूर्ण शो हसवत ठेवत त्‍यांचे मनोरंजन करतील. आम्‍ही आशा करतो की, प्रदर्शित झाल्‍यानंतर या शोचे जगभरातील प्रेक्षक कौतुक करतील.''  

हंगामा डिजिटल मीडिया आणि कॅफे मराठी यांच्‍याद्वारे निर्मित 'कट्यार' लवकरच हंगामा प्‍लेवर स्ट्रिमिंगसाठी उपलब्‍ध असेल.

Recommended

Loading...
Share