By  
on  

प्रेमाला मिळणारे अद्भुत वळण दाखवणारी 'वन्स अ ईयर' मराठी वेबसिरीजचा ट्रेलर पाहा

सध्या मराठी वेबसिरीज प्रेक्षकांची लोकप्रियता मिळवण्यात यशस्वी होत आहेत. यामध्ये 'एमएक्स प्लेयर' या ऑनलाईन विश्वातील लोकप्रिय कंपनीने सुद्धा पाउल टाकले आहे. 'एमएक्स प्लेयर' पहिलीवहिली मराठी वेबसिरीज 'आणि काय हवं'ला अमाप लोकप्रियता मिळाली. उमेश कामत-प्रिया बापटची प्रमुख भूमिका असलेल्या या वेबसीरिजने प्रेक्षकांची मनं जिंकली. 

'एमएक्स प्लेयर'ने आगामी दोन मराठी वेबसिरीजची घोषणा केली असून त्यातील एक वेबसिरीज रोमँटिक धाटणीची आहे. मंदार कुरुंदकर दिग्दर्शित 'वन्स अ ईयर' या रोमँटिक वेबसीरिजमध्ये निपुण धर्माधिकारी-मृण्मयी गोडबोले ही नवी फ्रेश जोडी पाहायला मिळत आहे. या वेबसीरिजमध्ये रावी आणि अरिहंत या दोघांमधील प्रेमाचा सहा वर्षांचा प्रवास पाहायला मिळणार आहे. 

 

मंदार कुरुंदकर दिग्दर्शित ही वेबसिरीज सहा भागांची असणार आहे. येत्या २० सप्टेंबर पासून ही वेबसिरीज 'एमएक्स प्लेयर' या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive