By  
on  

भल्याभल्यांचे वांदे करणारा 'काळे धंदे'चा नवा बोल्ड टीजर पाहा

वेबसीरिजचं वारं सध्या वेगाने वाहत आहे.हिंदी , इंग्लिशसोबत मराठी वेबसिरीज सुद्धा सध्या चर्चेत आहेत. आणि काय हवं, हुतात्मा, फायरब्रॅन्ड' सारख्या वेबसीरिजनी प्रेक्षकांचं मन जिंकलं. आता मराठीमध्ये एक हटके आणि बोल्ड कथानक असलेली नवी वेबसिरीज येत आहे जिचं नाव आहे'काळे धंदे'. या वेबसीरिजच्या पहिल्या टीजरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. 

या वेबसीरिजचा नवा टीजर नुकताच रिलीज झालाआहे.  या ट्रेलर मध्ये सुनील तावडे सुद्धा पाहायला मिळत आहेत. संस्कृती बालगुडे, शुभांकर कारंडे, निखिल रत्नपारखी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बोल्ड सीन्स आणि  शिव्यांनी भरलेल्या या नव्या टीजरमध्ये महेश मांजरेकर एका वेगळ्या भूमिकेतून सर्वांना फैलावर घेत असलेले पाहायला मिळत आहेत. 

शुभंकर तावडे, संस्कृती बालगुडे दोघांनी कोणते काळे धंदे केले आहेत आणि महेश मांजरेकर त्यांचा कसा पर्दाफाश करणार हे पाहायला प्रेक्षकांना मज्जा येणार हे नक्की! या तिघांसह अभिनेता निखिल रत्नपारखी सुद्धा विशेष भूमिकेत झळकणार आहे. ‘होणार भल्याभल्यांचे वांदे, जेव्हा उघड होणार लपवलेले ‘काळे धंदे’! नवीकोरी करकरित सिरीज ’ झी 5ची ही वेबसिरीज 24 सप्टेंबरला झी 5वर रिलीज होत आहे

Recommended

PeepingMoon Exclusive