By  
on  

स्पृहा जोशीने ‘रंगबाज’च्या युनिटसाठी बनवला स्वयंपाक

अभिनेत्री स्पृहा जोशी गेले काही दिवस आपल्या आगामी हिंदी वेबसीरिजच्या चित्रीकरणात व्यस्त होती. रंगबाज ह्या स्पृहाच्या नव्या वेबसीरिजचे चित्रीकरण मध्यप्रदेशमधील भोपाळ आणि चंदेरीमध्ये झाले आहे. रंगबाजच्या चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी स्पृहाने सर्वांसाठी मस्त मेजवानीचा घाट घातला.

मध्यप्रदेशच्या चंदेरीमध्ये रंजबाजची टीम राहत असलेल्या किला कोठी हॉटेलध्येच स्पृहाने सर्वांसाठी फक्कड स्वयंपाकाचा बेत आखला. चिकन करी आणि मस्त भेंडीच्या भाजीचा घाट घातला. रंगबाजच्या युनिटमधल्या शाकाहारींनी स्पृहाच्या हातच्या चविष्ट भेंडीच्या भाजीवर ताव मारला. तर मांसाहारी मंडळींनी चिकन करी फस्त केली. आपल्या हातचे जेवण सगळ्यांना आवडल्याचे पाहिल्यावर स्पृहाचाही चेहरा खुलला.

अभिनेत्री स्पृहा जोशी सांगते, “गेले कित्येक महिने आम्ही रंगबाजसाठी मेहनत घेत होतो. ह्या काळात एकमेकांसोबत भोपाळ, चंदेरी आणि मध्यप्रदेशच्या इतर भागांमध्ये चित्रीकरणा दरम्यान आम्ही सर्वच कलाकारांनी खूप वेळ एकत्र घालवला होता. त्यामुळे सर्वांसोबतच माझे जिव्हाळ्याचे संबंध झाले. ह्या सर्वांसाठी काहीतरी स्पेशल करावंस वाटलं. त्यामुळेच चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी माझ्या हातचं काहीतरी सर्वांना बनवून खायला घालावं, असं मनातं आलं. आणि मग शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा मी घाट घातला.”

स्पृहा पूढे म्हणते, “मला सर्वांसाठी प्रेमाने जेवण बनवायचा जेवढा आनंद झाला. त्यापेक्षा जास्त आनंद सर्वजण पोटभर जेवून, तृप्त झाल्यावर वाटला.” 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

कल ' रंगबाझ ' की शूटिंग का मेरा आखरी दिन था.. इन बस कुछ ही दिनों में इस प्यारीसी टीम के साथ एक लगाव सा होगया है.. यहाँ से मुंबई वापस जाने से पहले सोचा इन सब के लिये कुछ स्पेशल करूं.. तो यहाँ चंदेरी के होटेल ' कीला कोठी ' के किचन पर कब्जा़ करलिया.. पूरे स्टाफने बहोत ज्यादा मदद की.. बेहद खुशी है की जितना मजा़ मुझे खाना पकानेमें आया.. सबने बडे़ प्यारसे खाया और नवाजा़ भी.. बस! खाना बनते बनते मेरा दिन भी बन‌ गया! @rangbaazzee5 @zee5premium @jimmysheirgill @officialsushantsingh @sachin_yo

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad) on

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive